|| नात तुझं नी माझं ||
|| नात तुझं नी माझं ||
एक जमवले गेलेले नाते,
नवरा-बायकोचे, पती-पत्नीचे !!
पूर्वी कधी एकमेकांना पाहिलेही नव्हते,
कारण देवगड आणि कारवार कधी जवळ-जवळ नव्हतेच;
आता जन्मभर एकमेकांसोबत एकत्र रहाणार,
कारण देवगड आणि कारवार शेवटी मनाने जवळ-जवळ झालेच !!
आधी अनोळखी,
मग हळूहळू होत गेलेली ओळख,
हळूहळू होत गेलेला स्पर्श,
मग आलेले रुसवे - फुगवे,
हट्ट, भांडण आणि अबोला;
हळूहळू घट्ट होत गेलेली वीण,
मग झालेली एकजीवता, तृप्तता आणि एकनिष्ठ्ता !!
लग्न मूरायला थोडा वेळ लागला,
हळूहळू मूरत गेले आणि एकमेकांना निट ओळखले !!
आत्ता तर एकमेकांशिवाय करमतच नाही,
भविष्यात वृक्ष वाढेल, वेल बिलगेल घट्ट;
फुले येतील, फळे येतील; नात होईल अजून घट्ट !!
वय वाढत जाईल, ओढ वाढत जाईल,
एकमेकांवर अवलंबून रहाणे वाढत जाईल;
एकमेकांशिवाय चुकल्या चुकल्या सारखे होईल,
इतके एकमेकात गुंतून जाऊ कि स्वता:चे स्वतंत्र अस्तित्व विसरून जाऊ!!
किती अजब नाते हे आपले,
कोण कुणाचे.. कुठले दूर-दुर चे,
आज झाले आत्मरूप एक,
जवळ आलेल्या दोन जीवांचे !!
एक जमवले गेलेले नाते,
नवरा-बायकोचे, पती-पत्नीचे !!
- रो. लो.
Comments
Post a Comment