Posts

Showing posts from March, 2022

आहेस तरी तु कशी!!

  आहेस तरी तु कशी, आहेस तरी तु कशी!! कधी असतेस सांजवेळेच्या मंद प्रकाशा सरशी, तर कधी असतेस तप्त सूर्याची तांबूस लहरी!! कधी असतेस कोणताही रंग समावून घेणाऱ्या नितळ पाण्या सरशी, तर कधी असतेस स्वतःचाच रंग उधळणारी रांगोळी!! कधी असतेस आभासी मृगजळा सरशी, तर कधी असतेस सळसळणारी रक्त धमनी!! कधी असतेस खोल गुहेतील शांतते सरशी, तर कधी असतेस भरतीची सागर लहरी!! कधी असतेस बेफिकीर प्रेयसी सरशी, तर कधी असतेस कर्तव्यतत्पर अर्धांगिनी!! कधी असतेस यौव्वनातील मैत्रिणी सरशी, तर कधी असतेस शिस्तप्रिय मायाळू आई!! विभिन्न छटा पाहुनी तुझ्या, एव्हाना मज हे उमगले, की आहेस तु बहुगुणसंपन्नी, आहेस तु बहुगुणसंपन्नी!! - रो. लो.

|| नात तुझं नी माझं ||

 || नात तुझं नी माझं || एक जमवले गेलेले नाते, नवरा-बायकोचे, पती-पत्नीचे !! पूर्वी कधी एकमेकांना पाहिलेही नव्हते,  कारण देवगड आणि कारवार कधी जवळ-जवळ नव्हतेच;  आता जन्मभर एकमेकांसोबत एकत्र रहाणार,  कारण देवगड आणि कारवार शेवटी मनाने जवळ-जवळ झालेच !! आधी अनोळखी,  मग हळूहळू होत गेलेली ओळख,  हळूहळू होत गेलेला स्पर्श,  मग आलेले रुसवे - फुगवे,  हट्ट, भांडण आणि अबोला;  हळूहळू घट्ट होत गेलेली वीण,  मग झालेली एकजीवता, तृप्तता आणि एकनिष्ठ्ता !! लग्न मूरायला थोडा वेळ लागला,  हळूहळू मूरत गेले आणि एकमेकांना निट ओळखले !! आत्ता तर एकमेकांशिवाय करमतच नाही, भविष्यात वृक्ष वाढेल, वेल बिलगेल घट्ट;  फुले येतील, फळे येतील; नात होईल अजून घट्ट !! वय वाढत जाईल, ओढ वाढत जाईल, एकमेकांवर अवलंबून रहाणे वाढत जाईल; एकमेकांशिवाय चुकल्या चुकल्या सारखे होईल,  इतके एकमेकात गुंतून जाऊ कि स्वता:चे स्वतंत्र अस्तित्व विसरून जाऊ!! किती अजब नाते हे आपले,  कोण कुणाचे.. कुठले दूर-दुर चे,  आज झाले आत्मरूप एक,  जवळ आलेल्या दोन जीवांचे !! एक जमवले गेलेले...

मला तु सोबत हवी आहेस !!

पहाट झाली कि आपल्या खिडकी समोर असलेल्या बोराच्या झाडावर पक्षांची चिवचिव सुरु होते,  त्या किलबिलाचा सुखद मंद नाद कानाच्या पडद्यावर ऐकू येतो आणि दिनचर्येला सुरुवात होते,  त्या प्रारंभीपासून मला तु सोबत हवी आहेस !! चहा-आंघोळी,  दिवा-बत्ती होत होत,  ऑफिसच्या तयारीवेळी सुरू असलेल्या दैनंदिन गप्पागोष्टींच्या न्याहारीचा आस्वाद घेण्यासाठी मला तु सोबत हवी आहेस !! ऑफिसला जातांना रस्त्यावरील दुतर्फा ट्राफिकच्या कोंडीतून, डिवचणाऱ्या कर्णकर्कश्य हॉर्न्सच्या कोलाहलाचे रूपांतर मधुर स्वरसंगीतामध्ये करण्यासाठी मला तु सोबत हवी आहेस !! ऑफिसमधील व्यग्र कारभारात तासनतास तल्लीन असतांना, मधेच चौकशी, विनोदी अथवा निव्वळ स्माईलीज ने भरलेल्या वॉट्सॲप टेक्स्टची देवाणघेवाण करण्यासाठी मला तु सोबत हवी आहेस !! मध्यान्हावेळी जेऊन झाले कि, आज भाजी छान झाली होती, पुढल्यावेळी अशीच कर अथवा तशी ट्राय कर, हे सांगण्यासाठी मला तु सोबत हवी आहेस !! सांजवेळी हातात असलेले काम पटापट उरकण्यासाठी प्रेरित करणारी घराची ओढ तशीच टिकवून ठेवण्यासाठी मला तु सोबत हवी आहेस !! कातरवेळी घरी परत येतांना तुझ्या मोहक चेहऱ्यावरच...

आई आणि बाबा !!

|| आई आणि बाबा || आई तुळशी समोरचा दिवा असते, बाबा त्याचा मंद प्रकाश असतात!! आई अंगणातील रांगोळी असते, बाबा त्या रांगोळीतला रंग असतात!! आई देवासमोर लावलेली निरांजन असते, बाबा त्याची ज्योत असतात!! आई घरभर पसरलेली धूप असते, बाबा त्यातील सुगंध असतात!! आई मनावरचा संस्कार असते, बाबा ते घडवणारे असतात!! आई आयुष्याची वाट असते, बाबा त्या वाटेवर चालवणारे असतात!! आई एक वाक्य असते, बाबा वाक्यातील शब्द असतात!! आई एक कविता असते, बाबा त्याचा भाव असतात!! सूर्याचे तेज म्हणजे आई असते, बाबा त्यांची किरणे असतात!! आई असते आपली माऊली, त्या माऊलीची साथ बाबा असतात!! जिद्द म्हणजे काय हे आई असते, मनातला विश्वास म्हणजे बाबा असतात!! आई हे जग असते, बाबा हे जणू सारे विश्व असतात!! - रो. लो.