मला तु सोबत हवी आहेस !!
पहाट झाली कि आपल्या खिडकी समोर असलेल्या बोराच्या झाडावर पक्षांची चिवचिव सुरु होते, त्या किलबिलाचा सुखद मंद नाद कानाच्या पडद्यावर ऐकू येतो आणि दिनचर्येला सुरुवात होते, त्या प्रारंभीपासून मला तु सोबत हवी आहेस !!
चहा-आंघोळी, दिवा-बत्ती होत होत, ऑफिसच्या तयारीवेळी सुरू असलेल्या दैनंदिन गप्पागोष्टींच्या न्याहारीचा आस्वाद घेण्यासाठी मला तु सोबत हवी आहेस !!ऑफिसला जातांना रस्त्यावरील दुतर्फा ट्राफिकच्या कोंडीतून, डिवचणाऱ्या कर्णकर्कश्य हॉर्न्सच्या कोलाहलाचे रूपांतर मधुर स्वरसंगीतामध्ये करण्यासाठी मला तु सोबत हवी आहेस !!
ऑफिसमधील व्यग्र कारभारात तासनतास तल्लीन असतांना, मधेच चौकशी, विनोदी अथवा निव्वळ स्माईलीज ने भरलेल्या वॉट्सॲप टेक्स्टची देवाणघेवाण करण्यासाठी मला तु सोबत हवी आहेस !!
मध्यान्हावेळी जेऊन झाले कि, आज भाजी छान झाली होती, पुढल्यावेळी अशीच कर अथवा तशी ट्राय कर, हे सांगण्यासाठी मला तु सोबत हवी आहेस !!
सांजवेळी हातात असलेले काम पटापट उरकण्यासाठी प्रेरित करणारी घराची ओढ तशीच टिकवून ठेवण्यासाठी मला तु सोबत हवी आहेस !!
कातरवेळी घरी परत येतांना तुझ्या मोहक चेहऱ्यावरचे स्मितहास्य टिपून दिवसभरातील सर्व ताण-तणाव दूर सारण्यासाठी मला तु सोबत हवी आहेस !!
रात्री शांतचित्ताने दिवसभरात घडलेल्या चूक-अचूक, चांगल्या-वाईट, कमी- अधिक घटनांचा आढावा घेण्यासाठी आणि त्या सर्व गोष्टी योग्य मार्गाने पुर्ण करण्यासाठी मला तु सोबत हवी आहेस !!
याच दिनक्रमाने पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत,

रोज, अगदी दररोज, शेवटच्या श्वासापर्यंत,
माझे आयुष्य तुझ्यासोबत असेच अद्भुतरम्य जगण्यासाठी म्हणून...
मला तु सोबत हवी आहेस !!
मला तु सोबत हवी आहेस !!
मला तु सोबत हवी आहेस !!
मला तु सोबत हवी आहेस !!
Comments
Post a Comment